Share

चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म अजूनही कायम ; पहिल्याच रणजी सामन्यात झाला शून्यावर बाद

Published On: 

मुंबई : भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीतील एकेकाळचा भरवश्याचा फलंदाज असणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा वाईट फॉर्म हा अजूनही कायम असल्याचे सध्या दिसून येत आहे. चेतेश्वर पुजाराचा 2022 मधील रणजी स्पर्धेतील खराब फॉर्म अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.

सध्या देशांतर्गत महत्वाची क्रिकेट स्पर्धा असणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला आहे. सध्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी स्पर्धेतील सामना चालू आहे. पुजारा सध्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पण खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे चेतेश्वर पुजाराने आधी देशांतर्गत रणजी स्पर्धेत चांगले खेळून दाखवावे आणि मग नंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करावे असा सल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला होता. चेतेश्वर पुजारा बरोबरच अजिंक्य राहणे याला पण रणजी क्रिकेट स्पर्धा खेळावी असा सल्ला सौरव गांगुली यांनी दिला होता.

अजिंक्य राहणे याने पहिल्या रणजी सामन्यात उत्तम कामगिरी केली ;मात्र चेतेश्वर पुजाराला आपल्या फलंदाजीची छाप पाडता आली नाहीये. मुंबई विरुद्ध सौराष्ट्र या दोन संघात रणजी क्रिकेट सामना चालू आहे. मुंबईकडून फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे याने १२९ धावांची अतिशय अप्रतिम फलंदाजी केली, मात्र खराब फॉर्ममधून झगडणारा चेतेश्वर पुजारा याला आपल्या फलंदाजीची छाप पाडता आली नाहीये.त्यामुळे त्याला कदाचित आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागू शकते .

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!