Share

एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून असे कृत्य होणे हे अतिशय निंदनीय- रुपाली चाकणकर

Published On: 

मुंबई : भाजपच्या कार्यक्रमात जाऊन मंत्र्यांचा सत्कार केल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या भावजयीला जबर मारहाण केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे गोदावरी काॅलनी परिसरात घडली आहे. तसेच या प्रकरणी आमदार बोरनारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करून याचा अहवाल तीन दिवसांच्या आत राज्य महिला आयोगास सादर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली आहे.

यासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या भावजयीला व चुलत भावाला मारहाण केल्याची बातमी समाजमाध्यमाद्वारे समजली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून असे कृत्य होणे हे अतिशय निंदनीय आहे.’ तसेच या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून याचा अहवाल तीन दिवसांच्या आत राज्य महिला आयोगास सादर करावा, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणी आमदार रमेश बोरनारे यांच्यासह त्यांचा भाऊ संजय बोरनारे, दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रणजीत मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे, वर्षा संजय बोरनारे, संगिता रमेश बोरनारे आणि दिनेश शाहु बोरनारे या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!