Share

Shiv Jayanti 2022 : “जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती, तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही” – देवेंद्र फडणवीस

Published On: 

ठाणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सकल मराठा समजातर्फे ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या रक्तात जोपर्यंत छत्रपती आहेत. तोपर्यंत कोणी आम्हाला गुलाम करू शकत नाही आमच्या विचारात छत्रपती आहेत. कोणीही आमचे विचार थांबवू शकत नाही. आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचे समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही.”

या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सकल मराठा समाजाचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले आहे. शिवज्योत संपूर्ण ठाण्यात लोकाना दर्शनासाठी त्यांच्या दारापर्यंत जाते. आयोजित मिरवणूक त्यागाची जाणीव करून देते. मुघलांचे अत्यचार थांबवण्यासाठी एका क्रांतीसुर्याने जन्म घेतला. आणि शिवरायांनी खऱ्या अर्थाने हा मराठी मुलूख बदलून दाखवला, हा देश बदलून दाखवला, असे फडणवीस आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्यासाठी नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्यासाठी असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी सकल मराठा समाजाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अभिनंदन केले. भगव्याचा अलख पुन्हा एकदा आमच्यातील छत्रपती जागृत करेल, असे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!