🕒 1 min read
मुंबई : कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे. तिसगांवातील तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात साकारण्यात आलेली ही प्रतिमा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि कलेतून साकारण्यात आली आहे.
आज १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी तिसाई देवीच्या प्रांगणात शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिव प्रतिमेचे पुजन झाले. त्यानंतर विविध संस्था संघटनांना वृक्ष रोपांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी शिव प्रतिमेत वापरण्यात आलेल्या वृक्ष रोपांचेही विविध संस्था संघटनांना वृक्ष वाटप करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचे संगोपन करणाऱ्या संस्थांचा पुढील वर्षाच्या उत्सवात यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
