Share

भारताच्या चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये ‘डबल’ धमाका; द्विशतकही ठोकलं आणि…! पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : काही दिवसांपूर्वी चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) कसोटी क्रिकेटमधील खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून (team india) बाहेर पडला होता. मात्र आता त्याने जबरदस्त पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन दोनमधील एका सामन्यात ससेक्सकडून (sussex) खेळताना त्याने शानदार द्विशतक झळकावले. काऊंटी हंगामातील हा त्याचा पहिला सामना आहे. संघाचा पराभव टाळण्यातही तो यशस्वी ठरला आहेत.

या सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी, ससेक्सने दुसऱ्या डावात डर्बीशायरविरुद्ध ३ बाद ५१३ धावा केल्या. यानंतर खेळण्यासाठी १५ षटके शिल्लक होती. मात्र दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली. फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात ससेक्सचा संघ फलंदाजीसाठी उतरला. संघाला पहिल्या डावात केवळ १७४ धावा करता आल्या. त्याचवेळी डर्बीशायरने ८ बाद ५०५ धावा करून पहिला डाव घोषित केला. पुजारा ३८७ चेंडूत २०१ धावा करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत २३ चौकार मारले. पुजाराने ४६७ मिनिटे फलंदाजी केली. कर्णधार टॉप हॅन्सनेही २४३ धावा केल्या.

जानेवारी २०१९ पासून चेतेश्वर पुजाराला कसोटीत शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याला आणि अजिंक्य रहाणेला संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेत त्याने शेवटची कसोटी मालिका खेळली होती. त्याला ६ पैकी फक्त एका डावात ५० पेक्षा जास्त धावा करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!