Share

IPL 2022 : ऋषभ पंतने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ खास रेकॉर्ड, बनला अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत त्याच्या विस्फोटक शैलीतील फलंदाजीसाठी जगभरात ओळखला जातो. आरसीबीविरुद्ध खेळताना त्याने एक रेकॉर्ड बनवला आहे. ज्यात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने माजी कर्णधार विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला मागे टाकले आहे.

ऋषभ पंतने (Rishabh pant) वयाच्या २५ वर्षापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. ऋषभ सध्या २४ वर्षांचा आहे, त्यामुळे तो २५ वर्षांचा होईपर्यंत तो अजून धावांच्या संख्येत मोठी वाढ करू शकतो. ज्यापर्यंत पोहोचणे येणाऱ्या फलंदाजांसाठी कठीण होऊ शकते. पंतने आरसीबीविरुद्ध ३४ धावा केल्या. ज्यानंतर त्याच्या खात्यात एकूण २६४२ आयपीएल धावा जमा झाल्या. विशेष म्हणजे २५ वर्षांचा होण्यापूर्वी संजू सॅमसनने २५८४ आयपीएल धावा केल्या होत्या, तर विराट कोहलीच्या (Virat kohli) खात्यात २६३२ धावा जमा होत्या.

ऋषभ पंतने २०१६ मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हापासून ऋषभ फक्त दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. गेल्या वर्षभरापासून तो संघाचे नेतृत्वही करताना दिसत आहे. आयपीएल २०२२ साठी फ्रँचायझीने त्याला १६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. पंतच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने ८९ सामन्यात २६४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!