मुंबई: आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स जितका मजबूत दिसत आहे, तितकाच चेन्नई सुपर किंग्ज संघ कमकुवत दिसत आहे. अशा परिस्थितीत, जीटीचा सामना करणे सीएसकेसाठी अजिबात सोपे होणार नाही. चेन्नईला संघासह चाहत्यांच्या पाठिंब्याची गरज आहे, त्यामुळे CSK ने ऋतुराज गायकवाडचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मराठीत चाहत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे.
चेन्नई सुपर किंग्जने (CSK) पोस्ट केलेल्या व्हिडिओत ऋतुराजसह (Ruturaj gaikwad) मुकेश आणि राजवर्धन हंगरगेकर यांनी चाहत्यांना पाठींबा देण्यासाठी मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ज्यात ऋतुराज म्हणाला,”२०१८ मध्ये, जेव्हा चेन्नईचा संघ पुण्यात सामना खेळायला आला, तेव्हा स्टेडियममध्ये त्यांना सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचा मी देखील एक भाग होतो. या वर्षी तुम्हाला संधी मिळाली आहे, पुढची संधी कधी येईल याची खात्री नाही. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा बाहेर या आणि आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे.”
Travelling ⏪ in time!
Awaiting lot of ???? & ???? from our den away, like then in 2018!#GTvCSK #DenawayfromDen #WhistlePodu #Yellove ???? @Ruutu1331 pic.twitter.com/ap7jifAttj— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2022
आयपीएल २०२२सह सर्व लीग सामने यंदा महाराष्ट्रात खेळवले जात आहेत. ज्यात वानखेडे स्टेडियम मुंबई , ब्रेबॉन स्टेडियम मुंबई , डी वाय पाटील स्टेडियम मुंबई आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमच्या समावेश आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद सुसाट..! पंजाबला ७ गड्यांनी धूळ चारत ठोकला विजयी ‘चौकार’
- IPL 2022 CSK vs GT : हार्दिक पंड्या संघाबाहेर..! गुजरातच्या ‘नव्या’ कॅप्टननं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- IPL 2022 PBKS vs SRH : अरेरे..! सामन्याच्या पहिल्याच षटकात वेदनेनं विव्हळला शिखर धवन; बघा नेमकं झालं काय!
- IPL 2022 : २०वं षटक अन् तेही निर्धाव…! उमरान मलिकशिवाय ‘या’ गोलंदाजांनी केलाय हा पराक्रम; नक्की वाचा!
- “त्याची गोलंदाजी पाहून मला वकार युनिस आठवला”; भारताच्या माजी खेळाडूने केले उमरान मलिकचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

