🕒 1 min read
मुंबई : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने (bhuvneshwar kumar) आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मोठा पराक्रम केला आहे. आज पंजाब किंग्जविरुद्धच्या (PBKS vs SRH) सामन्यात भुवनेश्वरने आयपीएलमध्ये १५० विकेट्सचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. या सामन्यात भुवीने ३ विकेट घेतल्या.
या सामन्यापूर्वी त्याने पाच सामन्यांत पाच बळी घेतले होते. पण पंजाबविरुद्ध भुवनेश्वर आपल्या जुन्या रंगात दिसला. त्याने प्रथम शिखर धवनला बाद केले. यानंतर शाहरुख खान आणि लियाम लिव्हिंगस्टोनला माघारी पाठवले. या सामन्यात भुवीने अजून एक विक्रम रचला.
भुवनेश्वर कुमार आयपीएलमधील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. झहीर खान आणि संदीप शर्मा यांना त्याने मागे टाकले आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना शिखर धवनला बाद करून त्याने रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले. भुवनेश्वरकडे आता पॉवरप्लेमध्ये ५३ बळी आहेत, त्यानंतर झहीर खान आणि संदीप शर्मा यांचा क्रमांक लागतो.
A milestone to remember for our Swing King. ????????@BhuviOfficial#PBKSvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/EVL78KqQBl
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 17, 2022
आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून १५० विकेट्स घेण्याच्या बाबतीत भुवनेश्वर कुमार एकूण तिसर्या क्रमांकावर आहे. त्याच्याआधी लसिथ मलिंगा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी हा पराक्रम केला आहे. तर एकूण गोलंदाजांमध्ये १५० बळी घेण्याच्या बाबतीत भुवनेश्वर सातव्या स्थानावर आहे. या यादीत हरभजन सिंग, पियुष चावला आणि अमित मिश्रा यांचीही नावे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
