Share

IPL 2022 PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद सुसाट..! पंजाबला ७ गड्यांनी धूळ चारत ठोकला विजयी ‘चौकार’

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) सनरायझर्स हैदराबादने आपली विजयीरथ सुसाट हाकला आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने डी. वाय. पाटील स्टेडियमवर पंजाब किंग्जचा (PBKS vs SRH) ७ गड्यांनी पराभव केला आणि स्पर्धेतील सलग चौथा विजय नोंदवला. वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या तेजतर्रार माऱ्यासमोर पंजाबचा संघ १५१ धावांत आटोपला. मलिकने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात हैदराबादने १८.५ षटकात हे आव्हान पूर्ण केले.

हैदराबादचा डाव

पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनला (३) लवकर बाद केले. त्यानंतर अभिषेक शर्माने संयमी (३१) फलंदाजी केली. राहुल त्रिपाठीच्या साथीने त्याने अर्धशतकी भागीदारी उभारली. त्रिपाठीने ४ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या. राहुल चहरने या दोघांना बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. पण निकोलस पूरन आणि एडन मार्कराम यांनी विजयी भागीदारी करत संघाला चौथा विजय मिळवून दिला. पूरनने ३५ चर मार्करामने नाबाद ४१ धावा केल्या. १८.५ षटकात हैदराबादने आव्हान पूर्ण केले.

पंजाबचा डाव

मयंक अग्रवालच्या अनुपस्थितीत प्रभसिमरन सिंगने शिखर धवनसोबत पंजाबसाठी सलामी दिली. मात्र दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. हैदराबादचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने धवनला (८) तर टी. नटराजनने प्रभसिमरनला (१४) झेलबाद केले. त्यानंतर आलेला जॉनी बेअरस्टो (१२) सुचितच्या फिरकीवर पायचीत झाला. लियाम लिव्हिंगस्टोन आणि शाहरुख खान यांनी पंजाबसाठी अर्धशतकी भागीदारी उभारली. लिव्हिंगस्टोनने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६० धावांची खेळी केली. तो १९व्या षटकात बाद झाला, तर शाहरुखने २६ धावा जोडल्या. २०व्या षटकात पंजाबला एकही धाव घेता आली नाही, उमरान मलिकने टाकलेल्या या षटकात हैदराबादने ४ फलंदाजांना तंबूत धाडले. २० षटकात पंजाबचा संघ १५१ धावांवर आटोपला. उमरानने २८ धावांत ४ बळी घेतले. भुवनेश्वरने ३ फलंदाजांना बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!