Share

पछाडलेला! ‘सूड दुर्गे सूड…’, राणेंच्या अटकेनंतर भाजपाचे खोचक ट्विट

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अठक केली आहे. राणे यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता त्यांना महाड पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी महाडमधील पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर आता राणेंना महाड पोलीस ठाण्याकडे नेण्यात आलं आहे.

राणेंना अटक केल्यानंतर भाजपामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राजकीय सुडबुद्धीने राणेंवर कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे. जन आशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ठाकरे सरकारने सत्तेचा दुरुपयोग केल्याची टीका होत आहे. याच अनुषंगाने भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ‘पछाडलेला’ या मराठी चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेले इनामदार या पात्राचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर सुड दुर्गे सुड असा संवादही लिहिण्यात आला आहे. भातखळखर यांनी केलेले ट्विट हे नेमके कोणाला उद्देशून केले आहे याचा खुलासा दिलेला नाहीये. परंतू आजच्या घडामोडी पाहता ठाकरे सरकारला टोला लगावण्यासाठी त्यांनी हा फोटो आणि मजकूर पोस्ट केला असावा असा अंदाज आहे.

तर भाजपा नेते विनोद तावडे यांनी राणेंना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव का अमृत महोत्सव माहिती नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्याबद्दल संकोच न वाटता, त्या विरोधात बोलणारे नारायण राणे यांना अटक करणे निषेधार्ह आहे. ही महाविकास आघाडीची राजकीय घोडचूक आहे असे ट्विट तावडे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!