🕒 1 min read
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सर्व प्रकरणानंतर रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली. यावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
बळाचा वापर करत आहात. पोलिसांच्या जीवावर सुरु आहे का? सरकार सोडा आणि रस्त्यावर उतरा मग बघू काय करायचं ते. सरकारच्या जीवावर कोणाकोणाला त्रास देणार आहात?, असा उद्विग्ण सवाल यावेळी चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
या सगळ्या प्रकाराचा आम्ही निषेध करत आहे. भाजप या विरोधात प्रखर निदर्शने करेल, असा इशारा दिला आहे. ‘पुन्हा कोणी अशा प्रकारचं धाडस करु नये म्हणून निदर्शन प्रखर झाली पाहिजेत, असं आवाहन यावेळी चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार देशात घडवला. केवळ अनैसर्गिकपणे निवडून आलेल्या सत्तेचा दुरुपयोग करुन, लोकांनी निवडून दिलेलं नाही, अनैसर्गिकपणे एकत्र येत रोज कोणा-कोणाच्या मागं लागताय, हे फार काळ चालणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात अशा पद्धतीने केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची पहिलीच वेळ; राजकारणात उलथापालथ
- ‘…हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र’; राणेंच्या अटकेनंतर फडणवीसांची खोचक टीका
- ‘मुख्यमंत्र्यांच्या अंगी क्षमता, संयम आणि समंजसपणा देखील असावा’, आ.श्वेता महालेंचा टोला
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
