Share

‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका

Published On: 

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून यावर तीव्र संताप व्यक्त होत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही राणेंचा निषेध व्यक्त करत नाराजी दर्शविली आहे.

यावर आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अत्यंत विखारी शब्दात टीका केली आहे. ‘नारायण राणे म्हणजे भाजपे शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा आहे’, असे वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका ?

‘सन्माननीय मुख्यमंत्र्यांबाबत नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलं, त्यातून मोठा वाद उभा राहिलाय. बोलण्याच्या भरात कदाचित राणे ते वाक्य बोलले असतील. मात्र त्यांच्या मनात ते विधान करण्याचे असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं पद आहे. त्या पदाबाबत वा त्या पदावरील व्यक्तीबाबत बोलताना संयम बाळगणं हे आवश्यक आहे, असं आमचं मत आहे.’ असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे.

यासोबतच, ‘सरकारच्या कारवाईचे समर्थन केले जाऊ शकत नाही. वासरू मारलं तर गाय मारू अशी भूमिका सरकार घेत असेल तर भाजप राणेंच्या त्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, पण नारायण राणे यांच्या पाठीशी भाजप पूर्णपणे आहे,’ अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!