संगमेश्वर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील पोलिसांचे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वरमध्ये येथून ताब्यात घेतलं आहे.
नारायण राणे यांना आता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी बाहेरील परिसरात मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना अटक करतेवेळी राणेंची तब्येत खालावल्याची माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली होती. यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली असून माध्यमांना त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.
‘त्यांचे ब्लड, शुगर बघता आलेले नाही. त्यांचे ब्लड प्रेशर तपासलं असून ते अधिक आहे. ते डायबेटिक रुग्ण आहेत. ईसीजी करावी लागेल आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, असं निरीक्षण नोंदवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जेव्हा त्यांचे रक्तदाब तपासले तेव्हा १६०/११० होतं,’ असं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना जामीन मिळणार की जामीन न मिळताच रुग्णालयात नेलं जाणार हे महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलीस खात्यातील काही लोक सरकारने बस म्हटलं की लोटांगण घालतायत’
- पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यलयात सोडल्या मांजरी
- ‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका
- ‘छत्रपती संभाजीराजेंनासुद्धा संगमेश्वरमधून अटक केल्यानंतर औरंगजेबाचं सरकार संपलं होतं’
- हे सर्व चुकीच्या पद्धतीने चाललंय; राणे-शिवसेना वादावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

