🕒 1 min read
संगमेश्वर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील पोलिसांचे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वरमध्ये येथून ताब्यात घेतलं आहे.
नारायण राणे यांना आता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी बाहेरील परिसरात मोठी गर्दी केली आहे. भाजप नेते प्रमोद जठार यांच्या नेतृत्वात रस्ता रोखून धरला असून त्यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘नारायण राणे यांची सुटका होईपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह महाराष्ट्रभर भाजप आंदोलन करेल,’ असा इशारा जठार यांनी दिलाय.
पुढे ते म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरमधून अटक झाली होती. यानंतर औरंजेबाच्या सरकार संपलं होतं. संभाजीराजेंसोबत इथे दगाफटका झाल्यानंतर औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रात केलं होतं. त्यामुळे या सरकारनं लक्षात ठेवावं त्यांचं थडगं महाराष्ट्रात उभं केल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही. ठाकरे सरकारने हा दगाफटका केला असून खंडणीखोर बाहेर फिरत आहेत. गंभीर आरोप असलेले नेते, मंत्री बाहेर फिरत आहेत आणि या मराठ्याला सरकारने अटक केली आहे,’ असं म्हणत जठार यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलीस खात्यातील काही लोक सरकारने बस म्हटलं की लोटांगण घालतायत’
- पोलिसांवर दबाव, ते राणेंना अटक करायला वॉरंट विनाच पोहोचले; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
- ‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- नारायण राणेंचे अटक करण्यापूर्वी ट्विट, ‘…तरी आता मागे हटू नये!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
