मुंबई : राज्यात २०२४ मध्येही महाविकास आघाडीच सत्तेत येईल, असा दावा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनाच पसंती आहे आणि पवार यांनी पुणे येथील खासगी चर्चेत हे मत व्यक्त केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी टीका केली आहे.
सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, ‘२०२४ मध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार, त्यावेळसही शरद पवार यांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच- जितेंद्र आव्हाड. जनतेनंही ठरवलंय २०२४ मध्ये बदल हवाच. मविआचे कुशासन ते भाजपचे सुशासन. उघड दार देवा आता उघड दार देवा….’ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली आहे.
https://twitter.com/Sadabhau_khot/status/1469174197729382402
आव्हाड म्हणाले होते, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढले पाहिजे. शिवसेना मोठा भाऊ म्हणून त्यांचा जिल्ह्यात आदर करू; पण बोलायचे एक व करायचे एक असे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिला आहे. दरम्यान यावरूनच सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे कू कृत्य जनतेसमोर उघडे करू – आशिष शेलार
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’


