Share

जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ८ डिसें.रोजी तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. त्यात भारताचे सीडीएस बिपिन रावत(Bipin Rawat) हे सुद्धा होते. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जण शहीद झाल्याचे माहिती दिली आहे. यावरच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी देखील आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राऊत लेखात म्हणाले आहे की,’जंगलपहाडातला हा योद्धा शेवटी जंगलातच कोसळला. अनेक युद्ध रहस्ये, पुलवामासह अनेक रहस्ये जनरल रावत यांच्याबरोबर कायमची नष्ट झाली. कधीतरी जनरल रावत यांनी त्यावर प्रकाश टाकलाच असता. महान योद्धा, देशाचा शूर सुपुत्र जनरल बिपीन रावत यांना मानाचा मुजरा.’ तसेच पुढे ते म्हणाले की,’देशावर एकापाठोपाठ एक संकटे कोसळत आहेत, पण देशाच्या तीनही सेनादलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूने देश हादरला आहे. हिंदुस्थानी हवाई दलाच्या एमआय-१७ व्ही ५ या अत्यंत सुरक्षित आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टरला बुधवारी दुपारी तामीळनाडूतील कुन्न्tरच्या दाट जंगलात अपघात झाला. हेलिकॉप्टरला हवेतच आगीच्या ज्वाळांनी लपेटले व ते खाली कोसळले. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह संरक्षण दलाचे १३ अधिकारी व कर्मचारी त्यात ठार झाले आहेत. जनरल रावत हे शूर योद्धा होते. देशाच्या संरक्षणासाठी संकटांना छातीवर झेलणारे निधडय़ा छातीचे वीर होते. एक योद्धा म्हणून ते अनेक अपघातांना आणि संकटांना सामोरे गेले आहेत.

२०१५ साली जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरला नागालॅण्ड येथे अपघात झाला होता. त्यांच्या चॉपरने हेलिपॅडवरून उड्डाण केले व क्षणात ते खाली आले. त्यानंतर अधिकाऱयांच्या बैठकीत ते हसत हसत म्हणाले, ‘मी डोंगरपहाडातला माणूस आहे. अशा लहानसहान अपघातांत प्राण गमावणार नाही.’ जनरल रावत हे प्रत्यक्ष रणांगणावरचे सैनिक होते. त्यांच्या अस्तित्वानेच अनेकदा दुष्मनांना धडकी भरत असे. ३७ वर्षे त्यांनी लष्कराचा गणवेश आणि शौर्यपदके छातीवर अभिमानाने मिरवली. १९७९ साली सुरू झालेली त्यांची ही लष्करी सेवा बुधवारी दुपारी संपली. लडाख भागात चीनने छुपे अतिक्रमण केले आहे. कश्मीरात पाकडय़ांच्या दळभद्री कारवाया सुरूच आहेत. अशावेळी ‘एक इंच जरी आमच्या जमिनीवर घुसखोरी केलीत तर आहात तिथेच जमिनीत गाडू’असे सांगणारा व कृती करणारा सेनापती देशाने गमावला आहे. बिपीन रावत यांनी देशाचे लष्करप्रमुख म्हणून सेवा बजावली व लगेच देशाचे संरक्षण दलप्रमुख म्हणून नेतृत्व स्वीकारले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे देशाच्या तीनही सेनादलांचे प्रमुख हे नवे पद निर्माण झाले. तिन्ही दलांचे पहिले सेनापती म्हणून जनरल रावत यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

दरम्यान, लेखाच्या शेवटी ते म्हणाले की, जनरल रावत एक जांबाज सैनिक होते. प्रखर देशभक्त आणि सैन्यात जोश भरणारे सेनापती होते. रावत संरक्षण दलांच्या बैठकांतून जाणीव करून देत की, ‘आपण अत्याधुनिक व तांत्रिक बाबतीत चीनपेक्षा मागे आहोत व हिंदुस्थानी संरक्षण दलातील ही कमतरता लवकरच दूर करावी लागेल. नवे तंत्रज्ञान आणि भविष्यातील सतत बदलत जाणाऱया युद्धनीतीवर काम करावे लागेल.’त्यावर त्यांचा भर होता. हिंदुस्थानचे संरक्षण दल जगातील सक्षम आणि अत्याधुनिक बनावे यासाठी ते काम करीत होते. जनरल रावत हे तडकाफडकी बोलणारे व मोकळ्या स्वभावाचे होते. त्यांनी संरक्षण दलात अत्याधुनिकतेची कास धरली, पण ‘एमआय-१७ व्ही ५’ या हिंदुस्थानी नौदलाच्या सगळ्यात अत्याधुनिक हेलिकॉप्टरचाच अपघात झाला आणि त्यात रावत यांचे निधन झाले. रशियन बनावटीचे हे चॉपर हिंदुस्थानी नौदलाचे सगळ्यात सुरक्षित ‘वाहक’ मानले गेले आहे. त्यास अत्यंत सक्षम ‘पॉवरफुल’ दोन इंजिन, संकटकाळात कुठेही उतरण्याची व्यवस्था असते. तरीही हे अत्याधुनिक चॉपर कोसळले. जनरल रावत यांच्यासह १३ जणांनी त्यात प्राण गमावले.

जनरल रावत हे संरक्षण दलास नवे रूप, नवा आकार देत होते. म्हणूनच हा अपघात धक्कादायक आहे. त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी अपघात हा शेवटी अपघात असतो. तो तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असलेल्या लष्करी अधिकाऱयाच्या हेलिकॉप्टरचा झाला म्हणून अकारण वावडय़ा उठविणे योग्य नाही. जनरल रावत यांचे हेलिकॉप्टर हवेत पेटले व खाली कोसळले. त्यांच्या अंगावर लष्करी गणवेश होता. जनरल लष्करी संस्थेत एका व्याख्यानासाठी निघाले होते. ते कर्तव्य बजावत असतानाच शहीद झाले. जंगलपहाडातला हा योद्धा शेवटी जंगलातच कोसळला. अनेक युद्ध रहस्ये, पुलवामासह अनेक रहस्ये जनरल रावत यांच्याबरोबर कायमची नष्ट झाली. कधीतरी जनरल रावत यांनी त्यावर प्रकाश टाकलाच असता. महान योद्धा, देशाचा शूर सुपुत्र जनरल बिपीन रावत यांना मानाचा मुजरा!

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!