सातारा: शिवसेना नेते गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी देशाच्या राजकारणात जायचं असेल तर घराच्या बाहेर पडावं लागतं अशी टीका मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केली होती. यावरच आपण सेनेचं बोट धरुन मोठे झालात विसरु नका, असा इशारा शंभुराज देसाईंनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या या आरोपांना कोणताही आधार नाही.तसंच चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातून बोलुन वेगवेगळ्या वल्गणा करतायेत, अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली. तुमचे महाराष्ट्रात निवडून आलेले खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत त्यामुळं आमच्यावर असे आरोप करु नका. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरुनच भारतीय जनता पक्ष पुढं आलाय हे विसरु नका. बाळसाहेब ठाकरेंच बोट धरुनच ग्रामीण भागात तुमचा पक्ष वाढलाय हे माहती करुन घ्यायचं असेल तर अडवाणींना विचारा असा सल्ला सुद्धा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
दरम्यान शंभुराज देसाई सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे. दरम्यान शिवसेनेच्या जीवावर सुद्धा भाजपाचे खासदार निवडून आलेत हे विसरु नका. आता पुढच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाला जागा दाखवून देईल, असा इशारा शंभुराज देसाई यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- निवडणूकांचे वातावरण; सोयगावात १७ जागांसाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल!
- भीमा कोरेगाव प्रकरणातील सुधा भारद्वाज यांना ‘या’ शर्तींसह जामीन मंजूर
- तुमचे कू कृत्य जनतेसमोर उघडे करू – आशिष शेलार
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

