मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गॅस सिलिंडर स्फोटात चिमुकल्याचा मृत्यूप्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांच्या विरोधात मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी शेलार यांच्यावर IPC कलन ३५४ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शेलार यांनी जामिनासाठी अर्ज देखील केला होता.
जामीनाच्या मागणी नंतर आशिष शेलार यांना १ लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता आशिष शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी देखील केली आहे. जी केस बनूच शकत नाही ती केस बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले आहेत.
I moved Hon.High Court via Writ Petition No.19100 to quash the false criminal case foisted against me by this vindictive Thackeray Sarkar which is seeking to silence my voice exposing corruption & injustice being done to Mumbaikars!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 9, 2021
आशिष शेलार म्हणाले, न्यायिक व्यवस्थेतून सत्य मी बाहेर आणेन, पण यांना पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही सगळे सहकारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाविरोधात संघर्ष अजून कडवा करु. तुम्ही जेवढा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, भारतीय जनता पार्टी तो आवाज अजून उचलेल आणि तुमची कू कृत्य जनतेसमोर उघड करु, असा इशारा शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिलाय.
महत्वाच्या बातम्या:
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’
- ओबीसी आरक्षण: राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात; ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी
- रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघड केला; आ. संदिपान भुमरेंच्या भावाची एकाला मारहाण!
- मराठा आरक्षणासाठी राजकीय पक्षांनी ठोस भुमिका घ्यावी, राजेंद्र दाते पाटील यांचे मत!


