मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बॉयफ्रेंड विकी जैनशी (Vicky Jain ) लग्न करणार आहे. त्यासाठी संपूर्ण कुटुंबीय जोरदार तयारी करत आहेत. मात्र त्यापूर्वी अंकिता लोखंडेकडून चांगली बातमी आलेली नाही. अंकितासोबत असे काही झाले आहे की तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अंकिता लोखंडे हिच्या पायाला दुखापत झाली आहे. अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिचा पाय दाखवला आहे, आणि तिच्या पायाला प्लॅस्टर देखील केले आहे. अशा प्रकारे लग्नाआधीच अंकिता लोखंडे जखमी झाली आहे. दुखापतीनंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अलीकडेच त्यांनी त्याच्या बॅचलोरेटचे आयोजन केले होते, ज्यामध्ये टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये रश्मी देसाई आणि सृष्टी रोडे यांचा समावेश होता.
https://www.instagram.com/tv/CXIiDpBB6iH/?utm_source=ig_web_copy_link
एका वृत्तानुसार, डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला असून अंकिताला घरी आणण्यात आले आहे.’ अंकिताच्या पायाला दुखापत होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरमध्ये त्यांच्या विवाह सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मराठी पद्धतीने त्यांचे प्रीवेडिंग फंक्शन झाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- ‘हे लपवता येत नाही..’ म्हणत कॉमेडियन भारती सिंहने केला खुलासा
- मराठा आरक्षणासाठी राजकीय पक्षांनी ठोस भुमिका घ्यावी, राजेंद्र दाते पाटील यांचे मत!
- आयपीएल मेगा लिलावात ‘हे’ 5 खेळाडू ठरतील सर्वात महाग!
- महावितरणवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार; भाजप आ. प्रशांत बंब यांचा इशारा!
- गरज भासल्यास आशिष शेलार यांना अटक करा – रुपाली चाकणकर


