🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. परंतू राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला सहा जिल्ह्यांचे पालक मंत्री केले आहे. त्यामुळे यामुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. अशातच पवारांनी फडणवीसांवर केलेल्या वक्तव्याला भाजपचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
अजित पवार हे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं बोलावं लागतं, हे जरी खरं असलं तरी अजित पवार हे वस्तुस्थिती जाणणारे नेते आहेत, असं मी मानतो,असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटीलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावळी ते बोलत होते.
फडणवीसांकडे सहा जिल्हे दोन वर्षे राहणार नाहीत –
पुढे बोलताना पाटील म्हणाले, फडणवीसांकडे सहा जिल्हे दोन वर्षे राहणार नाहीत. ही वेळेनुसार केलेली तडजोड आहे. असं तुम्ही तुमच्या कार्यकाळातही केलं होतं. तुम्ही सहा मंत्र्यांच्या मदतीने तीन महिने सरकार चालवलं होतं. त्यावेळी प्रत्येकाकडे आठ-आठ खाती होती.
तसेच,एवढ्या मोठ्या राज्यात जेव्हा दोन पक्ष एकत्र काम करत असतात, तेव्हा खात्यांची किंवा जिल्ह्यांची सहमती व्हायला वेळ लागतो.आता राजकारण हा अर्धवेळ काम करण्याचा विषय राहिला नसून, राजकारणासाठी पूर्णवेळ द्यावा लागतो. मी स्वत: 15-15 दिवस घरी जात नाही. मोठेपणा म्हणून हे मी सांगत नाही, पण हेच सगळ्यांनी केलं पाहिजे असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant | वेदांता गेल्यानंतर उदय सामंत गुजरात दौऱ्यावर, CM सोबत करणार चर्चा
- Rohit Pawar | शिवसेनेच्या ‘जनआक्रोश मोर्चा’वर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Chandrakant Patil | “… त्यांच्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण
- Hindutva Chapter One Trailer | ‘हिंदुत्व चॅप्टर वन – मैं हिंदू हूं’ चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज
- Keshav Upadhye | “पेंग्विन सेनेच्या प्रमुखानी हिंदुत्व तर सोडलेच आहे आता विचारही पवार सोनियांचा सांगणार”
- Tanaji Sawant | “तानाजी सावंतानी माफी मागावी”, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
