Share

Hindutva Chapter One Trailer | ‘हिंदुत्व चॅप्टर वन – मैं हिंदू हूं’ चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज

Published On: 

Mumbai : बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत देशभरात बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. सनातन धर्माला कलंकित करणाऱ्या चित्रपटांनी चित्रपटसृष्टीत जोर पकडला असल्याची तक्रार देशभरातील लोक करत आहेत. याबाबत लोकांची तक्रार आहे, पण आता आम्ही तुम्हाला ज्या चित्रपटाविषयी सांगणार आहोत तो तुमचा विचार बदलेल. हा चित्रपट प्रत्येक सनातनी देशबांधवामध्ये एक लाट पसरवण्यासाठी पुरेसा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच होताच एकच खळबळ उडाली आहे. तो  चित्रपट म्हणजे ‘हिंदुत्व चॅप्टर वन – मैं हिंदू हूं’

ट्रेलर लॉंच

‘हिंदुत्व’ चा ट्रेलर गुरुवारी म्हणजेच आज लॉंच करण्यात आला आहे. ट्रेलर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या तासाभरात लाखो लोकांनी तो पाहिला. आणि यासोबतच लोकांनी या ट्रेलरचे खूप कौतुक केले आहे. हजारो लोकांनी कमेंट केल्या आणि ट्रेलर सतत शेअर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या या चित्रपटाचे पोस्टर खूप सुद्धा लोकांना खूप आवडले होते.

‘हिंदुत्व’ ची स्टोरी काय सांगते

या चित्रपटाची कथा आजच्या युगावर लिहिली गेली आहे. देशात पसरलेल्या अराजकतेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात लोकांना विशेषत: मुलींना मैत्रीमध्ये सावध राहण्याचा संदेशही यामध्ये देण्यात आला आहे. आजच्या तरुण पिढीला आपल्या धर्माचा अभिमान बाळगून धर्मासाठी कार्य करण्याचा संदेशही देण्यात आला आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये योग्य-अयोग्य भेद करून आपण परिस्थिती कशी समजून घेतो, हे या चित्रपटात सांगण्यात आले आहे.

‘हिंदुत्व’ ची स्टारकास्ट

या चित्रपटामध्ये आशिष शर्मा, सोनारिका भदोरिया आणि अंकित राज प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवादही करण राजदानने लिहिली आहे. चित्रपटाचे संगीत आणि संगीत दिग्दर्शक रविशंकर यांनी केले आहे.

‘हिंदुत्व’ रिलीज डेट

हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!