🕒 1 min read
मुंबई : वेदांता आणि फॉक्सकॉन लवकरच गुजरातमध्ये १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहेत. सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. मात्र, त्याची घोषणा होताच नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. खरंतर वेदांत आणि फॉक्सकॉनचा हा प्लांट महाराष्ट्रात उभारला जाणार असल्याची चर्चा आधी होत होती, पण जेव्हा घोषणा झाली तेव्हा गुजरातचं नाव समोर आलं. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.
या टीकेच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत आणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत उदय सामंत चर्चा करणार आहेत. गुजरातमध्ये कोणते उद्योग आहेत, याची माहिती ते घेणार आहेत. महाराष्ट्रात चांगल्या योजना आणण्यासाठी आढावा देखील घेतल्या जाणार आहे. वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर उद्योगमंत्र्याचे हे महत्वाचे पाऊल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उदय सामंत आणि मुनगंटीवार यांच्यासोबत काही शासकिय अधिकारी देखील आहेत. अहमदाबाद येथे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.
आदित्य ठाकरे आक्रमक!
महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या वेदांता-फॉक्सकॉनच्या निर्णयावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडल्यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला असल्याचे ते म्हणाले. प्रकल्प सुटल्याने राज्याचे होणारे नुकसान याविरोधात शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने शनिवारी पुण्यातील तळेगाव येथे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी हा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारला जाईल, अशी चर्चा होती.
वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाला महाराष्ट्राबाहेरचा रस्ता दाखवून बंडखोर आमदारांनी पक्षाची फसवणूकच केली नाही तर राज्यातील तरुणांचीही फसवणूक केली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिंदे सरकार हे ‘सरकार’ नसून सर्कस आहेत, असा टोला त्यांनी लगावला. वेदांतच्या प्रकल्पामुळे आणि मोठ्या ‘ड्रग पार्क’मुळे राज्याचे नुकसान झाल्याचे राज्याच्या उद्योगमंत्र्यांनाही माहीत नसल्याचा दावा त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | “… त्यांच्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण
- Hindutva Chapter One Trailer | ‘हिंदुत्व चॅप्टर वन – मैं हिंदू हूं’ चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज
- keshav Upadhye | “पेंग्विन सेनेच्या प्रमुखानी हिंदुत्व तर सोडलेच आहे आता विचारही पवार सोनियांचा सांगणार”
- Tanaji Sawant | “तानाजी सावंतानी माफी मागावी”, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
- Santosh Bangar | “जर मला राष्ट्रवादी,कॉंग्रेस सोबत जाण्याची वेळ आली…” ; हल्ल्यानंतर संतोष बांगर काय म्हणाले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
