Share

Tanaji Sawant | “तानाजी सावंतानी माफी मागावी”, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Published On: 

मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन आता मराठा आरक्षण मोर्चा आक्रमक झाला आहे.

मराठा आरक्षण कडून माफी मागण्याची मागणीः

आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही, तानाजी सावंत यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे.

तानाजी सावंत यांच्यावर निशाणाः

तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काही भान राहिले आहे का? असा सवाल करत तुम्हाला उघड समाजाच्या भूमिके सोबत येणं शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका, असं केदार म्हणाले. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा, अशी मागणी केदारांनी केली आहे.

दरम्यान, यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असं तानाजी सावंत म्हणाले. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं देखील सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!