मुंबई : वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 24 सप्टेंबर रोजी पुण्याच्या वडगावमध्ये ‘जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात होता. यावरून भाजप पक्षाच्या नेत्यांनी टीका केली होती. अशातच या मोर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार ?
आदित्य ठाकरे वेदान्ताबाबत हे केवळ बोलत नाहीत, ते पुरावेही देत आहेत. ते पुरावे बघितल्यानंतर असं दिसते आहे की, राज्यातल्या बऱ्याच कंपन्या गुजरात आणि इतर राज्यात जात आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांनाही फटकारलं आहे. रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, योगायोग म्हणजे डिसेंबर महिन्यात गुजरातची निवडणूक आहे. त्यानंतर कर्नाटकची आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लोकांच्या हितासाठी सुरू आहे की राजकारणासाठी?, असा प्रश्न पडतो.
तसेच, जर हे राजकारणासाठी सुरू असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण आहे की, दुसऱ्या राज्याच्या हिताचं राजकारण, हे बघितलं पाहिजे. खरं तर आदित्य ठाकरे हे लोकांत जाऊन वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Whatsapp Update | व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येत ‘हे’ नवीन फीचर
- Maharashtra Rain Update | यंदा परतीचा पाऊस लाबंणीवर, हवामान खात्याचा अंदाज
- Tanaji Sawant | मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंतांनी केलं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…
- Chandrashekhar Bawankule | “नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही”
- Bindass Kavya | फॉलोअर्स वाढवण्यासाठी बिंदास काव्या झाली होती गायब ; पालकांनी मिळून केला चित्रपटाला लाजवेल असा ड्रामा


