Share

Keshav Upadhye | “पेंग्विन सेनेच्या प्रमुखानी हिंदुत्व तर सोडलेच आहे आता विचारही पवार सोनियांचा सांगणार”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण गढूळ झालेलं दिसून येतं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. काही दिवसांपूर्वी दसरा मेळावा शिवाजीपार्कवर कोण घेणार, यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वाद निर्माण झाला होता. परंतू उच्च न्यायालयाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. तेव्हापासून उद्धव ठाकरेंवर विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. अशातच भाजप पक्षाचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये ?

उद्धव ठाकरे यांचा पेंग्विन सेनेचे प्रमुख असा उल्लेख करत केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे. यासंदर्भात उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे हे कॅाग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसैनिकात अंगार फुलवायचे, हिंदुत्त्वाचे सोने लुटायचे तिथे आता पेंग्विन सेनेचे प्रमुख कॅीग्रस राष्ट्रवादीचे गोडवे गाणार. हिंदुत्व तर सोडलेच आहे आता विचारही पवार सोनियांचा सांगणार, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी टीकेचा वर्षावच केला आहे. त्यामुळे या सगळ्यांना ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!