मुंबई : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षण बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. एवढंच नाही तर मराठा आरक्षण मोर्चा तानाजी सावंत यांच्यावर आक्रमक झाले असून तानाजी सावंतांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अशातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरणः
मराठा समाजाचं आरक्षण हे स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच भाजप-शिवसेना सरकारने दिलं. ते हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं, मग हे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर का टिकवता आलं नाही, त्यांना केस टिकवता आली नाही त्यामुळे रिझर्वेशन गेलं, असं सावंतांना म्हणायचं असल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे.
काय म्हणाले होते तानाजी सावंतः
दरम्यान, यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असं तानाजी सावंत म्हणाले. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं देखील सावंत म्हणाले.
मराठा आरक्षण यांची मागणीः
तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काही भान राहिले आहे का? असा सवाल करत तुम्हाला उघड समाजाच्या भूमिके सोबत येणं शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका, असं केदार म्हणाले. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- keshav Upadhye | “पेंग्विन सेनेच्या प्रमुखानी हिंदुत्व तर सोडलेच आहे आता विचारही पवार सोनियांचा सांगणार”
- Tanaji Sawant | “तानाजी सावंतानी माफी मागावी”, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
- Santosh Bangar | “जर मला राष्ट्रवादी,कॉंग्रेस सोबत जाण्याची वेळ आली…” ; हल्ल्यानंतर संतोष बांगर काय म्हणाले?
- Whatsapp Update | व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येत आहे ‘हे’ नवीन फीचर
- Maharashtra Rain Update | यंदा परतीचा पाऊस लाबंणीवर, हवामान खात्याचा अंदाज


