मुंबई: अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही संजय राऊत आणि शिवसेनेवर टिका केली आहे. संजय राऊत हे शरद पवारांचे एजंट आहेत, असं अप्रत्यक्ष रित्या ते यावेळी म्हणाले. तसेच पाटील यांनी सरकारमधील अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा विधिमंडळात माध्यमांशी बोलताना केला.
सध्या तपास यंत्रणा सरकारमधील काही मंत्र्यांची चौकशी करत आहेत. तसेच कारवाई देखील करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकार देखील भाजपच्या काही नेत्यांवर कारवाई करणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे अनिल देशमुख, अनिल परब, नवाब मलिक हे चौकशीच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अनिल देशमुख यांनी राजीनामा देखील दिला आहे. तर नवाब मालिकांच्या राजीनाम्याची भाजप सतत मागणी करत आहे. यातच आता पाटीलांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

