Share

धुलिवंदनानिमित्त पुण्यातील मार्केट यार्ड राहणार बंद!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : येणाऱ्या शुक्रवारी धुलिवंदनानिमित्त मार्केट यार्ड बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच भाजीपाला आणि पान बाजार या दिवशी सुरू राहणार असल्याचे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी जाहीर केले आहे.

येत्या शुक्रवारी मार्केट यार्डातील मुख्य बाजार आवारातील फुलांचा बाजार, केळी बाजार, तसेच मोशी उपबाजार बंद राहणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस बाजारात आणू नये, असेही सांगितले आहे.

फळे व भाजीपाला बाजारास धुलिवंदन सणाची साप्ताहिक सुट्टी जोडून येत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. १८) रोजी धुलिवंदना दिवशी फळे भाजीपाला बाजार व पान बाजार तसेच इतर उपबाजार नियमितपणे सुरू राहणार आहेत. याची नोंद व्यापारी, व्यावसायिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मार्केट यार्ड बंद असले तरी शुक्रवारी भाजीपाला आणि पान बाजार सुरूच राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!