Share

On This Day : सचिन तेंडुलकरच्या १००व्या शतकाला १० वर्ष पूर्ण!

Published On: 

मुंबई: आजच्याच दिवशी २०१२ मध्ये, क्रिकेट जगतात एक इतिहास लिहिला गेला कारण सचिन तेंडुलकर शिखरावर पोहोचला, जिथे आजपर्यंत कोणताही क्रिकेटपटू पोहोचला नाही. क्रिकेटचा देवमाणूस असलेल्या सचिनने शतकांचे शतक म्हणजेच त्याचे ४९ वे एकदिवसीय शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण १०० वे शतक ठोकले. ढाका येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध मास्टर ब्लास्टरने हा सुवर्ण इतिहास रचला.

त्यावेळी अप्रतिम कामगिरी करणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी हे शतक सोपे नव्हते, कारण ९९ ते १०० पर्यंत जाण्यासाठी त्याला जवळपास एक वर्ष वाट पाहावी लागली. सचिनने २०११ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याचे ९९ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. त्याच्या चांगल्या कामगिरीत केवळ शतकाचा अडथळा येत होता. जो त्याने २०१२ मध्ये हटवत रेकॉर्ड केला. तथापि, बांगलादेशने भारताला पाच गडी राखून पराभूत केल्याने तेंडुलकरच्या (sachin tendulkar) गौरवशाली कामगिरीची निराशा झाली होती.

सचिन तेंडुलकरचे शतक व्यर्थ गेले असूनही, मास्टर ब्लास्टर ही ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज बनला. त्याचा हा सुवर्ण रेकॉर्ड आजपर्यंत अस्पृश्य आहे. तेंडुलकरने डिसेंबर २०१२ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्याने ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८,४२६ धावा केल्या. तेंडुलकरच्या विक्रमाच्या सर्वात जवळ जाण्यात एकमेव सक्रिय क्रिकेटपटू विराट कोहली आहे, ज्याने आजपर्यंत ७१ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. सचिनला १०० शतक पूर्ण करण्यास २२ वर्ष लागली. त्याचा हा रेकॉर्ड कोणीही कधीही मोडू शकेल का यावर प्रश्नचिन्ह आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!