मुंबई: आज विधिमंडळात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे शिवसेनेचे लक्ष राहिलेले नाही. तसेच जगातले सगळे शहाणे शिवसेनेतच आहेत. त्यांना त्यांची जागा जनताच दाखवेल या शब्दात त्यांनी शिवसेना नेत्यांवर निशाणा साधला.
सामना शिवसेनेचं पॅम्पेलट आहे. सामनातून काँग्रेसबद्दल भाष्य केलं जातं. शरद पवारांनी यूपीएचं अध्यक्षपद भूषवावं असं म्हटलं जातं. काँग्रेसने काय करावं हे संजय राऊत देखील सांगताना दिसतात. पण हे काँग्रेसला आवडत नाही. काँग्रेसला काँग्रेसचं ठरवू द्या, जगातील सगळे शहाणे शिवसेनेतचं आहेत, त्यांची जागा त्यांना जनताच दाखवून देईल, असे मुनगंटीवार म्हणाले. तर, शिवसेना प्रमुख ऊद्धव ठाकरेंनी नाही तर एकनाथ शिंदेंनी व्हावं असं जर कांग्रेस बोलले तर मग संजय राऊत काय करणार असा सवाल मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित केला.
“भाजपचा विजय आभासी आहे, आम्ही इश्वर चरणी प्रार्थना करू की असाच आभासी विजय होऊ द्या, त्यांचा असाच आभासी पराजय होऊ द्या”, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“काश्मीर फाईल्सचे मोदी सर्वात मोठे प्रचारक”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काश्मीर फाईल्सचे सर्वात मोठे प्रचारक असल्याचे म्हटले आहे. “काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

