🕒 1 min read
मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. १२० धावा करण्याच्या प्रक्रियेत, बेन स्टोक्सने इतिहासाची नोंद केली आहे. या अष्टपैलू खेळाडूच्या नावावर आता ५,००० कसोटी धावा आहेत. ५००० कसोटी धावा आणि १०० पेक्षा जास्त कसोटी बळी मिळून तो आता जगातील फक्त पाचवा क्रिकेटपटू बनला आहे.
बेन स्टोक्स (ben stokes) गॅरी सोबर्स, इयान बोथम, कपिल देव (kapil dev) आणि जॅक कॅलिस यांच्यासह अष्टपैलू खेळाडूंच्या ऐतिहासिक यादीत सामील झाला आहे. दुसऱ्या दिवशी २४४ वर ३ स्थितीत, इंग्लंडच्या जो रूटला बेन स्टोक्सने साथ दिली आणि ही जोडी कॅरेबियन गोलंदाजांसाठी खरोखरच मारक ठरली. त्यांनी १२९ धावांची मोठी भागीदारी रचली.
— England Cricket (@englandcricket) March 17, 2022
संघाच्या एकूण धावसंख्येसह ३७३ वर ३ अशी १५३ धावा करून केमार रोचच्या गोलंदाजीवर रुट बाद झाल्याने त्यांची भागीदारी अखेर संपुष्टात आली. रूटच्या विकेटनंतर जॉनी बेअरस्टो फलंदाजीला आला आणि स्टोक्सच्या साथीने या दोघांनी आपल्या संघासाठी ४०० धावांचा टप्पा ओलांडला. बेअरस्टोला अल्झारी जोसेफने काढून टाकल्याने वेस्ट इंडिजला अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आणि स्टोक्सला १२० धावांवर ब्रॅथवेटने माघारी पाठवले.
महत्वाच्या बातम्या
- “बेवडा कंपनीचे भले केल्यानंतर आता…”, भातखळकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल
- IPL 2022: पंजाब किंग्ससोबतच्या भयावह सिजनचा स्टार खेळाडूकडून धक्कादायक खुलासा; म्हणाला…
- ‘तुम्ही खाताय ते शेण व आम्ही खातोय ते श्रीखंड’ असा भाजप नेत्यांचा कावा- संजय राऊत
- IPL 2022: ‘आम्ही येथे काहीही सिद्ध करण्यासाठी खेळणार नाही’; स्पर्धेआधीच हार्दिकने स्पष्ट केली भूमिका
- पोलीस व्यवस्थेस धमक्या द्यायच्या, ही कुठली रीत?- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
