नागपूर: काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएमने आघाडीची ऑफर दिली आहे. या कारणाने एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? ही चर्चा सुरु आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक टीका केली आहे. म्हणाले, एमआयएमने त्यांच्यासोबत जावे. ते शेवटी एकच आहेत. भाजपला हरविण्यासाठी सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी खोचक टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सत्तेसाठी ते काय करत आहेत ते पाहू. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेला लगावला आहे.
लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल. जे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –


