Share

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर इम्तियाज जलील यांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“अशा लोकांना आपण…”

Published On: 

औरंगाबाद : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे पुन्हा एकदा अश्याच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संभाजी भिडे म्हणाले की,‘आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचे बलिदान केले तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,’ असे खळबळजनक वक्तव्य भिडे यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना इम्तियाज जलील म्हणाले की,‘अशा प्रकारचा माणूस गुरुजी होऊ शकत नाही. लोकांना चांगले ज्ञान देणाऱ्या व्यक्तीला आपण गुरुजी म्हणतो. अशा लोकांना आपण गुरुजी म्हणत नाही.’ तसेच अजमल कसाब नावाचा एक दहशतवादी होता ज्याने आपल्या देशावर हल्ला केला होता. बंदुकीच्या जोरावर आपल्या देशाला कमकुवत करण्याचा उद्देश त्याचा होता. पण संभाजी भिडेंसारखी लोक बंदुकीचा वापर करत नाहीत. तर जिभेचा करतात, असेही जलील म्हणाले.

दरम्यान, आज संभाजी महाराज, औरंगजेब नाही. परंतु आजही औरंगजेब पाकिस्तान, बांगलादेश गाव वस्त्यांमधील मुस्लिमांच्या रुपाने शिल्लक आहे. परंतु संभाजी महाराजांची जी आग होती ज्यात त्यांनी ऐन तारुण्यात आपल्या देशाचा आणि धर्माचा अभिमान न सोडता, न झुकता, न मागे सरकाता, न शरण जाता त्यांनी देश देवाचा अभिमान मनात धरुन मरण पत्करले परंतु इस्लाम स्वीकारला नाही. आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचे बलिदान केले. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. हा शत्रू अनेक रुपात गावोगावी हिंदुस्तानमध्ये नांदतोय, हिंदुस्तानच्या बाहेरही नांदतोय, असे संभाजी भिडे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!