Share

“एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही”, संजय राऊतांनी केले स्पष्ट

Published On: 

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचारांचे आहेत. जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नाही.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. ज्यांच्यासोबत त्यांची छुपी युती आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो.’ तसेच राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!