Share

अखेर ग्लेन मॅक्सवेल झाला भारताचा जावई; विनी रमनसोबत बांधली लग्नगाठ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ग्लेन मॅक्सवेलचे भारताशी विशेष संबंध आहेत. त्याने कसोटीत पर्दापण भारताविरुद्धच केले होते. तर आयपीएलमध्ये त्याच्या कामगिरीनंतर त्याला भरपूर भारतीय चाहत्यांचे प्रेम मिळाले. व्यावसायिक संबंधांनंतर आता ऑस्ट्रेलियन स्टारने त्याच्या वैयक्तिक जीवनात भारतीय कनेक्शन जोडले आहे. मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमनसोबत लग्नगाठ बांधली आहे.

नुकतेच तामिळमध्ये त्यांच्या लग्नाची पत्रिका लीक झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगत होती. या नवविवाहित जोडप्याने सोशल मीडियावर हृदयस्पर्शी फोटो टाकत लग्न झाल्याची घोषणा केली. त्यांनी पोस्टला कॅप्शन दिले, “प्रेम म्हणजे पूर्णतेचा शोध आहे आणि तुझ्याबरोबर मला पूर्ण वाटते.” बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मॅक्सवेलने (glenn maxwell) प्रेयसी विनीशी (vini raman) विवाह केला आहे. ज्यामुळे आता भारताच्या विरोधी संघात खेळणारा मॅक्सवेल आता जावई झाला आहे.

मॅक्सवेलची पत्नी विनी रमन मेलबर्न मध्ये फार्मासिस्ट आहे. ती ऑस्ट्रेलियन शहरात राहणाऱ्या तामिळ कुटुंबातील आहे. ती ऑस्ट्रेलियात राहत असली तरी तिचे मूळ भारतीय आहे. लग्न झाल्यानंतर आता मॅक्सवेल लवकरच आयपीएलमध्ये (IPL 2022) आरसीबीसोबत खेळताना दिसणार आहे. यंदा आरसीबीने त्याला १५ कोटीत रिटेन केले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!