मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. यानंतर देशातील अनेक राजकीय पक्ष व नेत्यांकडून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नुकतीच अशी मागणी करण्यात आली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही जातीनिहाय जनगणना मागणी ही महाविकास आघाडी सरकारच्या त्रिस्तरीय पक्षात सहमतीने व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
जातीनिहाय जनगणना होणे अत्यंत आवश्यक असून ती राष्ट्रवादीची मागणी आहेच, शिवाय तशी भूमिकाही आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पक्षाच्या वतीने सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती करणार असल्याची जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता जातीनिहाय जनगणना ही मागणी जोर धरणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मंत्री, खासदार व प्रमुख नेत्यांची एक आढावा बैठक घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शरद पवार अधूनमधून अशा बैठका घेऊन राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा करत असतात. राज्यातील सर्व प्रश्नावर या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये राज्यसभेची निवडणूक, विधानपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावरही चर्चा झाली असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

