🕒 1 min read
मुंबई: काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत चिमटा काढला आहे.

‘कोरोनाचा ED व्हॅरियन्ट’ असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे. दरम्यान अंमलबजावणी संचलनालाय म्हणजेच ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसकडून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधींवर निशाणा साधत टोला लगावला आहे. दरम्यान या कारवाईनंतर काँग्रेसकडून संतापलेल्या प्रतिक्रिया उमटत असून भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- SL vs AUS 2022 : लसिथ मलिंगाची श्रीलंका संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती; वाचा!
- न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा खेळाडू बॅटिंग-बॉलिंग न करता पडला संघाबाहेर; वाचा!
- गुजरात टायटन्स पहिल्याच हंगामात ‘का’ चॅम्पियन बनला; मोहम्मद शमीनं सांगितलं ‘हे’ मोठं कारण!
- “फडणवीसांना खूष करण्यासाठी काही लोकांनी…” – आमदार अमोल मिटकरी
- “बैल एकटा नाही, जोडीने येतो आणि नांगरासकट येतो” ; देवेंद्र फडणवीसांचा वेगळा पॅटर्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
