Share

“…अंमलबजावणी आता राज्य सरकारच्या इच्छा शक्तीवर अवलंबून”, साकीनाका प्रकरणी भातखळकरांचा टोला

Published On: 

मुंबई: साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या मोहन चौहानला (Mohan Chouhan) दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ३१ मे रोजी मोहन चौहानला याप्रकरणात दोषी ठरवले होते.  मात्र आता लवकरच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला झालेली फाशीची शिक्षा स्वागतार्ह आहे. मात्र या शिक्षेची जलद अंमलबजावणी आता राज्य सरकारच्या इच्छा शक्तीवर अवलंबून आहे. सरकारला मर्दानगी दाखवण्याची सुवर्णसंधी आहे. उसनं अवसान आणा पण हे कराच.”, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान आरोपी मोहनने पिडीत महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगावर रॉडने वार केले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणी दिंडोशी न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!