मुंबई: साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या मोहन चौहानला (Mohan Chouhan) दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ३१ मे रोजी मोहन चौहानला याप्रकरणात दोषी ठरवले होते. मात्र आता लवकरच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे आता राज्यसरकारने उच्च न्यायालयात या शिक्षेवर लवकरात लवकर शिक्कामोर्तब होईल व त्या शिक्षेची अंमलबजावणी होईल असा प्रयत्न करावा तरच पीडितेला न्याय मिळेल व अशा अपराधाला पायबंद बसेल. घरी बसा पण एव्हढं जमवाचं.”, असा टोला चित्रा वाघ यांनी त्वेट करत लगावला आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे
आता राज्यसरकारने उच्च न्यायालयात या शिक्षेवर लवकरात लवकर शिक्कामोर्तब होईल व त्या शिक्षेची अंमलबजावणी होईल असा प्रयत्न करावा तरच पीडितेला न्याय मिळेल व अशा अपराधाला पायबंद बसेलघरी बसा पण एव्हढं जमवाचं
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 2, 2022
आरोपी मोहनने पिडीत महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगावर रॉडने वार केले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणी दिंडोशी न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह; भातखळकरांनी म्हटले ‘कोरोनाचा ED व्हॅरियन्ट’
- SL vs AUS 2022 : लसिथ मलिंगाची श्रीलंका संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती; वाचा!
- न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा खेळाडू बॅटिंग-बॉलिंग न करता पडला संघाबाहेर; वाचा!
- गुजरात टायटन्स पहिल्याच हंगामात ‘का’ चॅम्पियन बनला; मोहम्मद शमीनं सांगितलं ‘हे’ मोठं कारण!
- “फडणवीसांना खूष करण्यासाठी काही लोकांनी…” – आमदार अमोल मिटकरी


