Share

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या सणासुदीच्या दिवसात सर्व क्षेत्रात एम्पलोयी आपल्या बोनसची वाट बघत असतात. त्याचप्रमाणे शेतकरी देखील आपल्या पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तब्बल 10 कोटींहून अधिक शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची तयारी सुरू करायची आहे. ताज्या अपडेटनुसार, ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000  रुपयांचा हप्ता पाठवला जाऊ शकतो. दिवाळीपूर्वी ही रक्कम सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देऊ शकतो.

देशातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याच्या आतुरतेने वाट बघत आहे. ताज्या माहितीनुसार दिवाळीच्या आधीच पीएम योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांचे केवायसी नसल्यामुळे या 12 व्या हप्त्याला उशीर होत आहे.

पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यासाठी उशीर का झाला ?

जमिनीच्या नोंदीच्या पडताळणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्यास उशीर होत आहे. सप्टेंबर महिन्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. मात्र भूलेखांच्या पडताळणीमुळे आणि केवायसी मुळे सध्या या हप्त्याला उशीर झालेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12 वा  हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे केवायसी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांचे केवायसी नसेल त्या शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.

केवायसी नसल्यामुळे या योजनेच्या यादीत शेतकऱ्यांच्या नावात मोठी घट झालेली आहे. केवायसी नसल्यामुळे देशातील अनेक शेतकरी या योजनेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

12 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांनी यादीत नाव कसे तपासावे ?

पी एम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की ही यादी सतत अपडेट केली जात आहे. कारण KYC नसल्यामुळे या यादीतून लाखो शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यादी सतत तपासावी.
यादी कशी तपासावी :

  • https://pmkisan.gov.in/ ही विकृत वेबसाईट उघडा.
  • वेबसाईट उघडल्यावर फार्मर्स पोर्टलच्या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडतात त्यामध्ये तुमची राज्य, जिल्हा, ब्लॉग आणि गावाची माहिती भरा आणि त्यानंतर Get Report वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक यादी दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

पीएम किसान योजनेबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क

शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याबाबत काही शंका किंवा तक्रार असल्यास शेतकरी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर किंवा टोल फ्री नंबर वर संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकतात. त्याचबरोबर शेतकरी आपली तक्रार ईमेल आयडी द्वारे सुद्धा मेल करू शकतात.

  • हेल्पलाइन नंबर – 155261
  • टोल फ्री नंबर – 1800115526
  • ई मेल – pmkisan-ict@gov.in

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!