🕒 1 min read
सातारा : सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक विषयाच्या चर्च्या रंगू लागल्या आहेत. यामध्ये निवडणूकांचं वारंही राज्यामध्ये घुमू लागलं आहे. काल भाजप पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसतं. अशातच त्यांच्या याच टिकेवर शिवेंद्रराजे यांनी पलटवार केला आहे.
शिवेंद्रराजे भोसले यांचे वक्तव्य-
सल्याचं म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर हल्ला केला आहे. शिवेंद्रराजे यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. उदयनराजेंना मुंबई दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले नसल्याने ते चिडले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
उदयनराजेंच्या विरोधात मी 10 हजार अधिक मताने निवडून आलो आहे, त्यामुळे मला आल्हाद आमदारकी मिळाली हे उदयनराजे यांचे विधान बालिशपणाचे असल्याचे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले आहेत.
तसेच, उदयनराजे यांनी मी नगसेवकापासून खासदार झालो, असं ते म्हणाले होते. यावरही शिवेंद्रराजेंनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ते सांगायला विसले की ते नगरपालिकेला दोन वाॅर्डमध्ये उभे राहिले होते. एका वाॅर्डमधून ते पडले, तर दुसऱ्या वाॅर्डमधून ते निवडणून आले होते. जर तुम्ही स्वत:ला युगपुरूष,विकासपुरूष आहात तर मग तुम्ही दोन्ही वाॅर्डामध्ये निवडणूक यायला हवं होतं. त्याचबरोबर माझी आमदारकी आल्हाद मिळाली म्हणणाऱ्यांनी स्वत:च्या खासदारकीचाही प्रवास बघितला पाहिजे, असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- AB de Villiers । विराट कोहलीच्या शतकानंतर एबी डिव्हिलियर्सने केला मोठा खुलासा, ट्विटरवर केला गौप्यस्फोट
- Bhaskar Jadhav । शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, भास्कर जाधवांविरोधात पोलिसांत तक्रार
- Devendra Fadnavis | याकूब मेमन कबर प्रकरणाची चौकशी होणार; फडणवीसांनी दिले आदेश
- Sudhir Mungantiwar । सुप्रिया सुळेंच्या सरकारमध्ये एवढे मुख्यमंत्री होते की मोजता येत नव्हते – सुधीर मुनगंटीवार
- Chandrashekhar Bavankule | “2024पर्यंत उद्धव ठाकरेंकडे फक्त काही लोक शिल्लक उरतील”, चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
