Share

Girish Mahajan । “मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय”; व्हायरल ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

धुळे : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचं एक काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल होत आहे. या व्हायरल फोन कॉलच्या ऑडिओ क्लिपमध्ये (Audio Clip) गिरीश महाजनांनी उर्मटपणे उत्तर दिल्याचा आरोप होत आहे. या क्लिपमुळे राजकीय चर्चांना उधाण येत आहे. या ऑडिओ क्लिप संदर्भात गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते.

यासंदर्भात गिरीश महाजन यांना विचारणा केली असता त्यांनी यावेळी स्पष्टीकरण देताना सांगितले की, मला शिक्षक भरती विषयासंदर्भात जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असून कालपासून जवळपास 400 ते 500 फोन कॉल्स या विषयासंदर्भात जाणीवपूर्वक कॉल करून त्रास दिला जात असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

पण हा विषय माझा नसून हे सर्व काम शिक्षण विभागाचे आहे. दीपक केसरकर शिक्षण विभागाचे मंत्री आहेत. शिक्षक भरती संदर्भात कॅबिनेटमध्येही चर्चा झाली आहे. राज्य सरकार लवकरच शिक्षक भरतीची घोषणा करेल असं गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. जिल्हा परिषदेच्या भरती संदर्भात विद्यार्थ्याने मंत्री गिरीश महाजन यांना केलेल्या फोन कॉल दरम्यान हा विद्यार्थी मंत्री गिरीश महाजन यांना जिल्हा परिषदेची परीक्षा कधी होणार यासंदर्भात विचारणा करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

काय आहे प्रकरण?

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची एक ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिल्हा परिषद भरतीबाबत महाजन यांची विद्यार्थ्यासोबत झालेले संभाषणाची हि ऑडीओ क्लिप आहे. एका तरुणानं नोकरी भरती विषयी मंत्री गिरीश महाजनांना फोन केल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. यावेळी फोनवर बोलणारा व्यक्ती कोणत्यातरी फाईल बद्दल बोलत असल्याचं समजतं. मात्र, मुलं डिप्रेशन मध्ये असल्याच ही व्यक्ती महाजन यांना सांगत आहे. यावर तुम्हाला काही काम नाहीत का? दिवसभरातून 500 फोन लावता, ती फाईल मी रद्द केली, ठेव फोन, असं गिरीश महाजन यांनी म्हटल्याचा दावा आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!