औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद शहरामध्ये जाहिर सभा होत आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने या सभेसाठी जोरदार तयारी कर्ली होती. औरंगाबादमध्ये गावागावात बैठका घेत शिवसेनेने शक्ती पणाला लावली होती. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा झाली. या सभेला शिवसेनेने स्वाभिमान सभा असे नाव दिलेले आहे. या सभेत शिवसेना शक्तिप्रदर्शन करून विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यभरातून शिवसैनिक औरंगाबादमध्ये या सभेसाठी दाखल होत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी खासदार संजय राऊत सभेला संबोधित केले.
“औरंगाबादमधील या विराट जनसमुदायाच्या लाटांचा फटका जर भाजपाला बसला तर पाणी मागायला देखील उठणार नाही. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही विराट सभा आहे. काहीं लोकांनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असे संजय राऊत म्हणाले.
काहींनी इथे संभाजीनगरमध्ये आक्रोश करण्याचा प्रयत्न केला. पण इथे कसला आक्रोश करता? आक्रोश पाहायचा असेल तर भाजपाच्या नामर्द लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा. रोज अतिरेक्यांचे हिंदूंवर हल्ले होत आहेत. मागील २ महिन्यात काश्मीरमध्ये २७ काश्मिरी पंडीत, हिंदूंची घरात घुसून हत्या झाली आणि सरकार नामर्दासारखं हातावर हात ठेवून बसलंय, असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर घणाघात केला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

