Share

“शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा सतत प्रयत्न, राष्ट्रपती राजवटीचा कुटीर डाव,” ; नीलम गोरेंची टीका

Published On: 

सातारा : शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या विविध कामांच्या निमित्ताने सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. राज्यातील राजकीय वातावरण, भाजप, मनसे, राज ठाकरे, नारायण राणे इत्यादी विषयांवर नीलम गोरे यांनी भाष्य केले. साताऱ्यातील विश्राम गृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीचे सरकार असल्याने भाजप या महाविकास आघाडीला पाय उतार करण्यासाठी अनेक खेळ करत आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने “मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार” या घोषणा करत होते. मात्र त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागल्याने ते आता महाविकास आघाडीला या ना त्या कारणाने त्रास देऊन राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याचा कुटीर डाव खेळत आहे. मात्र ते कदापि पूर्ण होऊ शकणार नाही असा सणसणीत टोला उपसभापती व शिवसेना नेत्या नीलम ताई गोरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. साताऱ्यातील विश्राम गृहामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे टीकास्त्र सोडले आहे.

राज्यात भोग्यांचे राजकारण सुरू असुन त्यामुळे धर्माधर्मात तेढ निर्माण होत आहे. कायद्याची अंमलबजावणी राज्यसरकार करत आहे. मात्र शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने अनेकांचे पोटशूळ उठले आहे, असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. नारायण राणे सुक्ष्म मंत्री असल्याने चार्ज ही छोटसं असेल. युती तोडण्याचे काम करत करत शिवसेनेला संपवण्यासाठी ५५ आमदार इतर पक्षातुन फोडुन घेतले. शिवसेनेला संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा सातत्याने प्रयत्न चालु आहे. मी परत न आल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची होते मागणी. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे हे वेगळे झाले. आता स्व:ता च्या पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न मनसेचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!