मुंबई: रयत शिक्षण संस्थेच्या मिटिंगसाठी सुप्रिया सुळे या साताऱ्यात पोहचल्या आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असा इशारा दिला आहे. या विषयी पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारले असता. सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशामध्ये कोणालाही कुठे ही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. नवनीत राणा यांच्या पेक्षाही राज्यात अती गंभीर विषय आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयाकडे मी गांभीर्याने पाहत नाही.
महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालतो आणि आम्ही ही तोच विचार पुढे घेऊन जात आहोत. देशामध्ये कोणालाही कुठे ही लढायचा अधिकार आहे. शाहु महाराजांना अभिमान वाटेल असे काम आज या गावाने केल आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे पुरोगामी विचारांच सरकार आहे. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचे हे सरकार आहे, असेही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –

