Share

IPL 2022 : काय सांगता…! हार्दिकला गुजरात संघात हवाय मुंबई इंडियन्सचा ‘हा’ खेळाडू; नाव ऐकाल तर..!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचे मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्डसोबत चांगले संबंध आहेत. हार्दिक मुंबई संघात असताना त्याने अनेकदा पोलार्डसोबतचे किस्से शेअर केले होते. यावरून दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री असल्याचे दिसते. आता हार्दिकने पोलार्डबाबत एक वक्तव्य केले आहे.

हार्दिक म्हणाला, ”पोलार्डचा दिवस चांगला जावा अशी माझी इच्छा आहे. मी त्याला काही दिवसांपूर्वी त्याची विचारपूस करण्यासाठी मेसेजही केला होता. यावेळी मी मस्करीत म्हटले, की तू पुढच्या वर्षी आमच्याकडे येशील. ही माझी इच्छा आहे, पण मला माहीत आहे की ते कधीच होणार नाही.”

पोलार्ड आणि पंड्या दीर्घकाळ मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळले आहेत. पंड्या ब्रदर्सचे पोलार्डशी चांगले संबंध आहेत. मैत्रीही खूप चांगली आहे. मुंबईकडून खेळताना हे सर्वांनी पाहिले आहे. या मोसमात पंड्याला सोडून मुंबईने वेगळा संघ निवडण्याचा प्रयत्न केला. अशात गुजरातने पांड्याला संघाचा कर्णधार बनवले. गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी केली.

उत्तम खेळाडू आणि रणनीतीच्या जोरावर गुजरात संघाने यंदा चांगली कामगिरी केली आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ यंदा खराब टप्प्यातून जात आहे. मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. रोहित शर्माचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे. याशिवाय पोलार्डलाही या मोसमात धावा करता आल्या नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!