Share

IPL2022 SRH vs RCB : विराटचा वाकून नमस्कार..! कार्तिकची ‘तुफानी’ खेळी बघून कोहलीही भारावला; पाहा PHOTO!

Published On: 

मुंबई : दिनेश कार्तिक आयपीएलच्या १५व्या (IPL2022) हंगामात एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा अनुभवी यष्टीरक्षक फिनिशरची भूमिका अतिशय चोख बजावत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH vs RCB) आयपीएलच्या ५४व्या सामन्यात कार्तिकने ३७५च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. कार्तिकची ही वेगवान खेळी पाहून आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीही खूश झाला. कार्तिक ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर विराटने त्याला वाकून नमस्कार केला आणि नंतर त्याला मिठी मारली. विराट आणि कार्तिकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१५९ धावांवर आरसीबीने त्यांचे दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर दिनेश कार्तिक आरसीबीच्या कर्णधाराला पाठिंबा देण्यासाठी मैदानात आला. कार्तिकने ८ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ३० धावा केल्या. आरसीबीने सध्याच्या मोसमात कार्तिकला जे काम दिले आहे ते काम तो आतापर्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे.

https://twitter.com/lucifer54043/status/1523303480022093824

या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. कोहली जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये परतत होता तेव्हा तो खूप निराश झाला होता, पण कार्तिकची खेळी पाहून त्याला आनंद झाला. यादरम्यान विराटच्या चेहऱ्यावर मोठे हसू उमटले.

सामन्याबाबत..

आयपीएल २०२२ (IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर (SRH vs RCB) ६७ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रविवारी (८ मे) रंगेलल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात बंगळुरुचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत हैदराबादला १९३ धावांचे आव्हान दिले. विराट कोहली पुन्हा गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी केली आणि दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात वानिंदू हसरंगाच्या पाच बळींमुळे हैदराबाद संघ १२५ धावांत आटोपला. त्यांच्याकडून राहुल त्रिपाठीने अर्धशतकी झुंज दिली. या विजयासह बंगळुरूने मागच्या दारुण पराभवाचा वचपा काढला आहे. हैदराबादविरुद्ध आरसीबीचा संघ ६७ धावांवर ऑलआऊट झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!