न्यूयॉर्क : बि – टाऊनमधील प्रसिद्ध स्टार जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल. हे प्रसिद्ध जोडपं लग्न झाल्यापासून सोशल मिडीयावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत. चाहते देखील या दोघांच्या फोटोवर प्रचंड प्रेम व्यक्त करतात.
या जोडप्याच्या लग्नाला नुकतेच आता पाच महिने पूर्ण झाले आहेत. या प्रसंगी अभिनेत्री कतरिना कैफ हिने तिच्या लग्नाला पाच महिने पुर्ण झाल्याच्या सेलीब्रेशनचेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या फोटोनुसार कतरिना आणि विकी न्यूयॉर्कमध्ये सेलीब्रेशन करत असल्याचे दिसत आहे.
कतरिनाने तिच्या इंस्टाग्रामवरून काही तासांपूर्वी विकी कौशलसोबतचे फोटो शेअर केले होते. पहिल्या फोटोत कतरिना रेस्टॉरंटमध्ये हिरव्या रंगाच्या टॉपमध्ये पोज देताना दिसली होती आणि त्याचवेळी विकी-कतरिना हसत हसत एकमेकांसोबत फोटो क्लिक करताना देखील दिसले.
सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर करताना कतरिनाने कॅप्शन मध्ये लिहिले कि “सर्व गोष्टींचे घर, माझी आवडती जागा.” विकी ने देखील न्यूयॉर्कच्या रस्यावर फिरताना कतरीनाच्या खांद्यावर हात ठेवतानाचा फोटो शेअर केला आहे. विकीने या फोटोला कॅप्शनमध्ये लिहले की शुगर रश. या फोटोंना आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


