Share

गुणरत्न सदावर्तेंची नव्या एसटी संघटनेची स्थापना, विलीनिकरणाचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार!

Published On: 

मुंबई : गेली पाच महिने राज्यात एसटीचचे आंदोलन सुरु होते. एसटीचा हा सर्वात मोठा आंदोलन होता. शेवटी हे आंदोलन चिगळलं. या आंदोलनात एक नाव कायम चर्चेत होतं, नंतर ते वादात सुद्धा सापडलं. ते नाव म्हणजे वकील गुणरत्न सदावर्ते. सुरुवातीला एसटीचं आंदोलन सुरु झालं तेव्हा या आंदोलनाचं नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलं. यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे आलं. सदावर्ते हे एसटीचं विलीनीकरण या मुद्द्यावर ठाम राहिले. मात्र कोर्टानेच एसटी कामगारांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र या दरम्यानच सदावर्ते यांचं एक भाषण वादात सापडलं.

शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेलं एसटी कामगारांचे आंदोलन सदावर्ते यांच्या भाषणामुळे घडून आल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच त्यांना जमीन मिळाला आहे. आता सदावर्ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज नव्या एसटी कामगाऱ्यांच्या संघटनेची घोषणा केली आहे.

‘एसटी कर्मचारी कष्टचारी जनसंघ’ असे सदावर्ते यांच्या नव्या संघटनेचं नाव आहे. आम्हाला कोणत्याही संघटनेची ऍलर्जी नाही, आरएसएस पासून कोणतीही संघटना आमच्यात सामील होऊ शकते, असे सदावर्ते म्हणाले.

कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी कोणत्याही जाती धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात. त्या सर्व अभ्यासकांचे स्वागत आहे. पुढील प्रश्न या संघटनेच्या मार्फत मार्गी लावण्यासाठी आता प्रयत्न होतील, असेही सदावर्ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!