कोल्हापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. कोल्हापूरमध्ये बोलत असताना अनेक मुद्यांवर भाजपवर टोलेबाजी करत असताना पाहायला मिळाले. यामध्ये केंद्र सरकारमुळे देशावर वीजेचे संकट आहे, यासह 56 इंचवाले देश विकत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकारला देशाला बुडवायचे आहे. पण केंद्रातील भाजपाला फक्त काँग्रेसच विरोध करू शकते. नेहरूंवर टीका करता आणि त्यांनीच बनवलेले आज हे लोक विकत आहेत. 56 इंचवाले देश विकत आहेत.
केंद्रातील सरकार देश हितासाठी काहीच काम करत नाही. त्यामुळे 2024 मध्ये राज्यात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असेल. येत्या काळात भाजपाला या प्रकारांचे परिणाम दिसून येतील. असा इशाराच नाना पटोलेंनी दिला.
महत्वाच्या बातम्या –
“…तुम्ही धोका दिल्याचं दु:ख”; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
IPL 2022 : लखनऊ संघात सामील झाला ‘धाकड’ खेळाडू; राहुलनं दिली जर्सी! पाहा VIDEO
मनसेच्या विद्यार्थी सेनेने वाटले भोंगे
“ये दोनो मिल्खा सिंग से भी तेज…”, सोमय्या पिता-पुत्रांवर संजय राऊतांचा हल्लाबोल
“स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही”, हनुमान चालीसा प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची मनसेवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

